माझ्या बद्दल.

      मी सैय्यद इम्रान सुभान, अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी, खर तर मी एक विचित्र व्यक्तिमत्वाचा शांन्त स्वभावाचा साधा-सुधा,जबाबदारी स्विकारनारा मुलगा आहे, माझा जन्म तारीख २३ मार्च १९९२ रोजी दुपारी ३ वाजुन २४ मिनिटाला अहमदनगर मधील कोपरगाव येथे झाला. योगायोग असा की माझ्या जन्मा च्या दिवशीच माझ्या वडीलाना एच.ए.एल [Hindustan Aeronautics Limited] या शासकिय कंम्पनीत सरकारी नोकरी लागली. सरकारी नोकरी असल्याने मला वय ३ अस्तानांच अभ्यासात टाकले गेले.

          सन १९९६ साली माझ्या वडीलांना धोक्याने कामावरुन कमी करण्यात आले. तेव्हा पासुण घर व शिक्षणाचा सर्व भार शेती वर आला,परंतु वडिलांनी चालक म्हणुन काम करणे पसंत केले. घरगुती प्रकरनांमुळे भरपुर त्रास झाला. कसे तरी प्राथमिक शिक्षण कोकणगाव येथिल प्राथमिक शाळेत पुर्ण झाले. ते बालपणाचे दिवस खुप काही शिकवत-शिकवत कधी संम्पले काही कळालेच नाही.

      त्या नंतर माध्यमिक शिक्षणा साठी एच.ए.एल मधील गो.ए.सो च्या हायस्कुल मधे प्रवेश घेतला,
आर्थिक चुनचुनी मुळे जिवना पासुन भरपुर काही शिकालो,शेतात काम केल्या मुळे भारतीय शेतकरी माझ्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला , भावंडां मधे मोठा असल्यामुळे भरपुर अनुभव मिळला. स्वतः मधे  सक्ष्मता आणि जिद्द आणली, स्वावंलंबणतेचे धडे तर मला माझ्या घराण्यांतीलच मोठ्यां पासुन मिळले.

       मी कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतन मधुन आय.टी या शाखेची पदविका ८२.२० % गुणांसह घेतली आहे. सध्या मी क.का.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.
 माझ्या भावी आयुष्यात मला काहीतरी प्रभावशाली कर्तुत्व करायची खुप इच्छा आहे..

       या जगात माझा الله [one god] वर सर्वांत जास्त विश्वास आहे आणि जो त्रिकाल बाधित सत्य आणि अटळ आहे. मी इस्लामचा एक चांगला अनुयायी बनण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पाच वेळेच्या नमाज पठणाचा देखील माझा खुप प्रयत्न सुरु असतो. काही भटकलेल्या लॊकांमूळे जी इस्लाम ची प्रतिमा मलिन होत आहे ती जगातील सत्यांच्या अनुयायीं समोर मांडण्याची देखील मला इच्छा आहे, आणि सत्य तर एक दिवस समोर आल्या शिवाय राहणार नाही.

      जगातील बहुतेक धर्मांचा अभ्यासात देखील मला विशेष रुची आहे. यात सनातन धर्मांतील विशेषतः वेदांचा ही मला थोडा फार अभ्यास आहे. पवित्र कुराण मधील पाक आयतां बरोबर श्रीमदं भागवत गीताचे काही अध्याय देखील मला कंठंस्थ आहे.

बाणा माझा एकच आहे-



" जे माझ्या साठी झटले, धडपडले त्यांच्या साठीच मी हे आयुष्य फुलवत आहे."
धन्यवाद !!
कोकणगाव येथिल आमचा मळा.
माझी सायकल

Post a Comment

4 Comments

  1. इम्रान, तू तुझा ब्लॉग खूपच छान बनविला आहे.
    कीप ईट अप

    ReplyDelete
  2. @Nitin: immu is not best, best is that who created immu...

    ReplyDelete

Do your comment here..